सरकारी निधीअभावी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे काम रखडले
सातारा, १३ जुलै (वार्ता.) – आतंकवादी अजमल कसाब याला जिवंत पकडतांना हौतात्म्य स्वीकारणार्या तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम भारतियांच्या हृदयात ठसून राहिला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील केडंबे गावच्या या सुपुत्राच्या स्मारकाचा प्रश्न लवकरात लवकर सरकारने मार्गी लावाला, अशी मागणी ग्रामस्थ आणि जावळीकरांनी केली आहे. यापूर्वी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी सरकारने १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले होते; मात्र गत अनेक वर्षांपासून हे स्मारक रखडले आहे.