दळणवळण बंदी हटवण्याविषयी पाचगणी (जिल्हा सातारा) येथील व्यापार्यांचे आंदोलन
सातारा, १३ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील दळणवळण बंदी हटवण्यात यावी, अशी मागणी सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर पाठोपाठ आता पाचगणी येथील व्यापार्यांनीही केली आहे. १२ जुलै या दिवशी पाचगणी येथील व्यापार्यांनी दळणवळण बंदी हटवण्याचा विचार व्हावा, यासाठी बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला उभे राहून मूक आंदोलन केले. या वेळी व्यापार्यांनी हातामध्ये फलक धरले होते. महाबळेश्वर आणि पाचगणी येथील व्यापार हा पर्यटनावर अवलंबून आहे.