‘लोकमत’ आणि मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान !
मिरज, १२ जुलै (वार्ता.) – दैनिक ‘लोकमत’ आणि ‘मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले. याच्या उद्घाटन प्रसंगी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोजबाबा शिंदे-म्हैसाळकर, दैनिक ‘लोकमत’चे सांगली आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे, ‘लोकमत’चे व्यवस्थापक विक्रम हसबनीस उपस्थित होते. या वेळी माजी मंडळ अधिकारी देवेंद्र आरगे, उद्योजक अजित कबुरे, प्रतिक कबुरे, डॉ. कार्तिक घोरपडे, डॉ. संताजी शिंदे, नरवाडचे उपसरपंच डॉ. रामगोंडा पाटील यांसह अन्य उपस्थित होते. ‘अक्षय रक्तपेढी’ने रक्तसंकलन केले.