हिंदूंनी संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे (विरोधकांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे) प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा देणे आवश्यक ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय
आंध्रप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी घोषित केले की, वर्ष २०२० मध्ये मंदिरावरील आक्रमणांच्या २२८ घटना नोंद झाल्या होत्या. त्यावरून या हिंदूविरोधी घटनांमागे एक नियोजित षड्यंत्र आहे, ते दिसून येते. मूर्तीभंजन करणारे लोक मूर्तीपूजेला विरोध करतात आणि मूर्ती, तसेच मंदिरांची तोडफोड करतात. विशिष्ट पंथांना अधिक अनुदान देण्यासह त्यांच्याशी निगडित लोकांची पदांवर नियुक्ती केली जात आहे. विशिष्ट पंथाला धरून कारभार केला जात आहे, असे प्रथमदर्शनी दिसते. राज्यघटनेनुसार सरकार आणि शासकीय संस्था यांनी एकसंध राहून कोणताही भेद न करता कार्य करायला हवे. खरेतर सरकारने सर्व धर्मियांना सुरक्षा पुरवली पाहिजे; मात्र सरकार एका विशिष्ट धर्माकडे झुकलेले दिसते. हे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण नाही. हिंदूंवर होणार्या अन्यायाची जागृती व्हायला हवी. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे (विरोधकांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे) प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा दिला पाहिजे.