काँग्रेस हिंदुत्वविरोधी पक्ष असून मला पूजा-पाठ करण्यापासून रोखतो ! – काँग्रेसचे आमदार राकेश सिंह
काँग्रेसला घरचा अहेर !
काँग्रेसवाल्यांना इतक्या उशिरा हे कसे लक्षात येत आहे ?
रायबरेली (उत्तरप्रदेश) – मी जेव्हा कधी पूजा किंवा अखंड रामायणाचा पाठ करतो, तेव्हा काँग्रेस मला हे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. काँग्रेसची ही नीतीच राहिली आहे की, कुणी चांगले काम करू नये. काँग्रेस पक्ष शतप्रतिशत हिंदुत्वाचा विरोध करणारा पक्ष आहे. मी पक्ष सोडणार नाही. (काँग्रेस हिंदुविरोधी आणि राष्ट्रघातकी आहे. असे असतांनाही हा पक्ष सोडावासा का वाटत नाही, याचे उत्तर संबंधितांनी जनतेला द्यायला हवे ! – संपादक) ‘काँग्रेस ८५ टक्के असणार्या लोकांना (हिंदूंना) सोडून १५ टक्के लोक असणार्यांना (मुसलमानांना) घेऊन पुढे जाऊ इच्छित असेल, तर काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडतील’, अशी चेतावणी येथील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला १८ पैकी एकही जागा मिळालेली नाही. रायबरेली परिसरात पंचवटी परिवाराचे वर्चस्व आहे आणि तो काँग्रेसशी संबंधित आहे. या निवडणुकीत या परिवाराचे राकेश सिंह प्रचारापासून लांब राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या पराजयास राकेश सिंह उत्तरदायी आहेत, असे बोलले जात आहे.
‘Congress is fundamentally anti-Hindu and pro-Muslim party, stops me from doing puja’: Uttar Pradesh Congress MLA Rakesh Singhhttps://t.co/zMHEVKO3JH
— OpIndia.com (@OpIndia_com) July 11, 2021