सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत वाढ !
सांगली, १२ जुलै – ९ जुलै या दिवशी संपणार्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोरोना ‘पॉझिटीव्हिटी’ दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आणि २० टक्क्यांपेक्षा अल्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.