देवतांच्या मूर्तींसह असलेल्या तरुणीचे छायाचित्र प्रसारित केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांची ‘नासा’वर टीका !
‘नासा’कडून इंटर्नशिप करण्यासाठी अर्ज करण्याचे ट्वीटद्वारे आवाहन केल्याचे प्रकरण
|
नवी देहली – अमेरिकेची विश्वविख्यात अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’कडून ‘इंटर्नशिप’ (प्रशिक्षण) मिळवण्यासाठी अर्ज करण्याविषयीचे एक ट्वीट करण्यात आले आहे. ट्वीटमध्ये ४ प्रशिक्षणार्थींची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत. यांत प्रतिमा रॉय या हिंदु तरुणीचेही छायाचित्र आहे. या छायाचित्रात रॉय यांच्या मागील बाजूस हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि चित्रे दिसत आहेत. त्यामध्ये श्री सरस्वतीदेवी, श्री दुर्गादेवी, भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्या मूर्ती अन् चित्रे दिसत आहेत, तसेच एक शिवलिंग ठेवल्याचेही यात दिसत आहे. यावरून सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीका करणारे बहुतांश भारतीय वंशाचे आहेत. (हिंदूंच्या देवतांची पूजा करणारे विज्ञानवादी होऊ शकत नाहीत का ? कथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा विज्ञानवाद किती भंपक आहे, हे यातून दिसून येते. दुसरे म्हणजे भारतियांचे पाय खेचण्यात आणि जगात त्यांचा अवमान करण्यात भारतीयच पुढे आहेत, हे यातून दिसून येते. हे संतापजनक होय ! – संपादक) काही जणांनी ‘रॉय यांचे हिंदूंच्या देवतांसमवेत छायाचित्र प्रसारित करून नासाने विज्ञानालाच नष्ट केले’, असा नासावर आरोप केला आहे. (असा आरोप करणार्यांनी ‘नासाने अंतराळ क्षेत्रात जे कार्य केले आहे, त्याच्या १ टक्का तरी कार्य केले आहे का’, हे प्रथम सांगावे ! अशी फुकाची टीका करणे हास्यास्पद नव्हे का ? – संपादक) तर काही जणांनी प्रतिमा रॉय यांना, ‘हिंदूंच्या देवतांसमवेत छायाचित्र काढण्याची काय आवश्यकता आहे ?’ अशा आशयाचे प्रश्न विचारले आहेत. दुसरीकडे रॉय यांचे कौतुकही केले जात आहे.
वर्ष २०१४ मध्ये भारताच्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन’च्या यशस्वितेवर प्रकाश टाकणारा ‘स्पेस मॉम्स’ नावाचा चित्रपट वर्ष २०१९ मध्ये प्रसारित झाला होता. चित्रपटाचे निर्माते डेविड कोहेन यांनी नासाच्या वरील ट्वीटसंदर्भात प्रतिमा आणि पूजा रॉय या दोघी बहिणींचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे. ते लिहितात, ‘अंतराळातील प्रवास हा भारतियांच्या ‘डीएन्ए’मध्ये (मूळ वृत्तीत) आहे. प्रतिमा आणि पूजा यांचे मी या निमित्ताने अभिनंदन करतो.’ या ट्वीटला पुष्कळ प्रसिद्धी मिळत आहे.
Today’s the day: applications for fall NASA internships are due!
Are you ready? Visit @NASAInterns and apply at: https://t.co/s69uwyR1LJ pic.twitter.com/CVwFJGYbms
— NASA (@NASA) July 9, 2021
आम्ही जे काही करतो, ते देव पहात असतो ! – प्रतिमा रॉय
भारतीय वंशाच्या प्रतिमा आणि पूजा रॉय या दोघी बहिणी ‘नासा ग्लेन रिसर्च सेंटर’मध्ये ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर को-ऑप इंटर्नशिप’ करत आहेत. नासाने त्यांना त्यांच्या अनुभवांविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यावर प्रतिमा यांनी म्हटले होते, ‘माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जे काही करतो, ते देव पहात असतो.’
Line from @spacemomsmovie: “Space exploration is in the Indian DNA.”
Another line (woman talking about her granddaughter): “She’s going to ace [her exam]. Science is in her blood.”
Kudos to @NASA interns Pratima Roy and Pooja Roy for embodying the spirit of #SpaceMOMs! pic.twitter.com/0jBt8ionJY
— David B. Cohen (@DavidBCohen1) July 11, 2021