काँग्रेसचे राहुल पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
कोल्हापूर, १२ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार पी.एन्. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव शिंपी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १२ जुलै या दिवशी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी भाजपने माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली.