सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ११ जुलैला कोरोनाचे २७० नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ सहस्र ७५३ झाली आहे. ११ जुलैला १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३९ सहस्र ६२७ झाली आहे. सद्य:स्थितीत ४ सहस्र रुग्णांवर उपचार चालू आहेत. ११ जुलैला ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र १२३ झाली आहे. उपचार चालू असलेल्या ४४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.