वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. दुर्गा कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

सौ. दुर्गा कुलकर्णी

१. ‘गुरुपूजनानंतर आम्ही सर्व जण आरतीसाठी उभे होतो. आरतीच्या तिसर्‍या कडव्याच्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टर पांढर्‍या शुभ्र पोशाखात सूक्ष्मातून आसंदीवर बसलेले दिसले. त्या वेळी आरती भावपूर्ण होत होती आणि माझ्या डोळ्यांत भावाश्रू दाटून आले होते.

२. आरती संपल्यावर मी सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉक्टरांना वंदन करण्यास वाकले. तेव्हा एक चरण प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) आणि एक चरण परात्पर गुरु डॉक्टरांचे दिसत होते. ‘आज असे का होत आहे ?’, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि त्याचे उत्तर देवानेच दिले, ‘आज गुरु-शिष्य परंपरेचा दिवस आहे.’

३. मी संध्याकाळी ७ वाजता देवासमोर दिवा लावला आणि देवाला दहीभाताचा नैवैद्य दाखवला. त्या वेळी मला दिव्याच्या ज्योतीत भगवान श्रीकृष्ण, श्री दत्तगुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले.’

– सौ. दुर्गा कुलकर्णी, सोलापूर (१८.८.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक