हा आदेश नेहमीसाठी हवा !
‘सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात २२.७.२०२१ पर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी कोणतीही कृती करणे, आक्षेपार्ह घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, जिल्ह्यात ५ किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे आदी कृती करण्यास मनाई असणार आहे.’