लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या कह्यात !
साडेसात लाख रुपयांची लाच घेतांना पकडले
पोलीस लाच घेतांना सापडणे हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! असे लाचखोर पोलीस अधिकारी सामान्य जनतेला न्याय काय देणार ?
सोलापूर – अवैध मुरूम उपसा प्रकरणात आरोपीला साहाय्य करण्यासाठी साडेसात लाख रुपयांची लाच मागणार्या सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना ९ जुलै या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या दोन्ही अधिकार्यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे अवैध मुरूम उपसा प्रकरणात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर आरोपीला या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी दोन्ही पोलीस अधिकार्यांनी लाचेची मागणी केल्याने सदर आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.