सातारा जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालणार्या तृतीयपंथीयांवर गुन्हा नोंद !
सातारा – जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्य पोळ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगितल्यामुळे चिडून तृतीयपंथीयांनी ७ जुलै या दिवशी रुग्णालयात गोंधळ घातला. आधुनिक वैद्यांना पाया पाडण्यास भाग पाडले. तृतीयपंथीयांच्या संग्राम संस्थेच्या आर्या पुजारी, हिना पवार यांच्यासह ६ जणांनी आधुनिक वैद्य पोळ यांना मारहाण केली. साहित्याची मोडतोड केली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ आणि वैद्यकीय अधिकारी नियम २०१० कलम ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.