कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने नगर येथील २२ गावांत ८ दिवसांची दळणवळण बंदी घोषित !
नगर – पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील २२ गावांत ८ दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील परिस्थितीची नोंद घेत कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या गावांत केवळ औषध दुकाने, भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र चालू रहाणार असून विवाह, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ विनाअनुमती घेता येणार नाही. शंभर टक्के चाचण्या तसेच बाहेरून येणार्यांचे गावातील शाळेत ७ दिवसांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.