प्रियकर सनी खानकडून ‘ब्लॅकमेल’ करण्यात येत असल्याने १४ वर्षांच्या हिंदु मुलीची आत्महत्या
हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने त्या धर्मांध तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात आणि त्याचा शेवट अशा घटनांत होत असतो, हे लक्षात घ्या !
हावडा (बंगाल) – येथील ८ वी इयत्तेत शिकणार्या पामेला अधिकारी या विद्यार्थिनीने घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली. १४ वर्षांची पामेला राष्ट्रीय स्तरावरील कराटे खेळाडू होती. सनी खान नावाच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल (धमकावणे) केले जात असल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
१. पामेलाची बहीण प्रियांका हिने सांगितले की, पामेलाचे गेल्या २ वर्षांपासून सनी खान याच्याशी प्रेमसंबंध होते. सनीने पामेलासमवेत काढलेल्या काही छायाचित्रांद्वारे तो तिला ब्लॅकमेल करत असे. सनी याने पामेलाशी प्रेमसंबंध असतांनाही एका मुलीशी विवाह केला. यामुळेच पामेला हिने आत्महत्या केली.
२. पोलिसांनी सनी खान याच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी ते अधिक चौकशी करत आहेत. सनीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.