ट्विटरकडून विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती
नवी देहली – ट्विटरने भारतासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विनय प्रकाश यांची नियुक्ती केली आहे. ट्विटरच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. ट्विटरने देहली उच्च न्यायालयात ‘११ जुलैपर्यंत तक्रार निवारण अधिकार्याची नियुक्ती करण्यात येईल’, असे सांगितले होते. त्यानुसार ट्विटरने अधिकार्याची नियुक्ती केली. ट्विटरने केंद्रशासनाने नव्याने लागू केलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील नियम प्रारंभी मान्य केले नव्हते. याविषयी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर ट्विटरने ते मान्य करण्याची संमती दर्शवली होती. त्यानुसारच तक्रार निवारण अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
Twitter names Vinay Prakash as Resident Grievance Officer for India under new IT rules https://t.co/CetZjfLQXy
— Republic (@republic) July 11, 2021