विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ !
‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य सांगणार्या एकमेवाद्वितीय श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
‘आतापर्यंत आम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत कैलास-मानससरोवर, अमरनाथ, गंडकी-मुक्तीनाथ, ज्योर्तिलिंग, शक्तिपीठ इत्यादी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे; मात्र त्या सर्वांमध्ये ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ येथील प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे.
१. ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा संदर्भ कुठल्याही ग्रंथात नसणे
सूर्यताल आणि चंद्रताल यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा आजपर्यंत कुठल्याही ग्रंथामध्ये किंवा अन्य कुठेही संदर्भ नाही. कैलास पर्वताला विश्वाची ‘सुषुम्ना नाडी’ म्हटले आहे; मात्र विश्वाची सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांविषयी कुठेही संदर्भ मिळत नाही.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखातून ‘सूर्यताल आणि चंद्रताल हे विश्वाची अनुक्रमे सूर्यनाडी अन् चंद्रनाडी आहेत’, असे ज्ञान मिळणे
ऋषिमुनींना श्रृति, स्मृति किंवा दर्शने या रूपांत ईश्वराकडून ज्ञान मिळाले. त्याचप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना मिळणारे ज्ञान हे ईश्वरी ज्ञान आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखातून ‘सूर्यताल आणि चंद्रताल हे विश्वाची अनुक्रमे सूर्यनाडी अन् चंद्रनाडी आहेत’, असे ज्ञान आले. तेच शब्दप्रमाण आहे.
३. याविषयी शोध लावायला वैज्ञानिकांना सहस्रो वर्षे लागू शकणे
वैज्ञानिकांना ‘गॉड पार्टिकल’चा (दैवी कणाचा) शोध लागला; मात्र त्यांना अजूनही ‘सत्त्व, रज आणि तम’ या सूक्ष्मातीसूक्ष्म त्रिगुणांचा उलगडा झाला नाही. त्याचप्रमाणे आता ‘सूर्यताल आणि चंद्रताल हे विश्वाची अनुक्रमे सूर्यनाडी अन् चंद्रनाडी आहेत’, हे संशोधन करायला वैज्ञानिकांना सहस्रो वर्षे लागतील. असे करूनही ‘त्यांना यश मिळेल’, याची निश्चिती नाही.
४. कृतज्ञता
ज्ञानाचे स्वरूप ‘सत्-चित्-आनंद’ असते. ज्ञान सत्य आणि अविनाशी असते. ‘असे सत्-चित्-आनंद स्वरूपी ज्ञान देणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्हा साधकांना लाभल्या आहेत’, यासाठी आम्ही साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. विनायक शानभाग, कुलु, हिमाचल प्रदेश. (१०.७.२०२१)
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत अनुमाने ८ लाखांहून अधिक कि.मी. प्रवास करून अशा प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. त्यामुळे आपल्याला इतिहासाच्या आणि पृथ्वीच्या पोटात दडलेल्या दैवी स्मृतींचे छायाचित्रमय दर्शन घडत आहे ! त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! |
यासंदर्भातील अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण वाचण्यासाठी येथे क्लिक करा !