हिंदु राष्ट्र स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

पू. संदीप आळशी

‘धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून कार्य होण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’ ! थोडक्यात ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणे, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ साधना आहे. यासाठीच ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, ही परात्पर गुरु डॉक्टरांची आत्यंतिक तळमळ आहे. या तळमळीपोटी ते आजही प्राणशक्ती अत्यल्प असतांना ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रंथकार्यासाठी एक प्रकारे त्यांचा संकल्पच झालेला आहे. परात्पर गुरु डॉक्टरांसारख्या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून साधकांनीही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.

ग्रंथकार्यात सहभागी होण्याची इच्छा असणारे, ग्रंथनिर्मितीची सेवा करणारे, ग्रंथांचा प्रसार करणारे, ग्रंथांसाठी अर्पण मिळवणारे, ग्रंथांचे वितरण करणारे अशा सर्वांनाच साधनेची अपूर्व सुवर्णसंधी लाभली आहे. सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !’

– (पू.) संदीप आळशी (२१.६.२०२१)