सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस !

सातारा, १० जुलै (वार्ता.) – ‘ईडी’ने नुकतीच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा कसा केला, याची माहिती तातडीने सादर करा, अशी नोटीस सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ठोठावली आहे.

कारखान्यांशी सबंधित असणार्‍या आस्थापनांची चौकशी चालू आहे. ज्यांनी जरंडेश्वर कारखाना लिलावात घेतला त्यांना ४ बँकांनी कर्जपुरवठा केला होता. त्यात सातारा जिल्हा बँकेनेही ९६ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. हा कर्जपुरवठा नेमका कसा केला, याची माहिती ‘ईडी’ने मागवली आहे.