अपव्यवहाराच्या प्रकरणी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा ! – भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
नगर – शिवसेनेचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख त्यांच्या काळात जलसंधारण खात्यातील साडेसहाशे कोटी रुपयांचा अपव्यवहार विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उघडकीस आणला. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून गडाख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नेवासा तालुक्यातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे. प्रसिद्धिमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही मागणी केली.
जलसंधारणातील 650 कोटींची जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, मुरकुटेंची मंत्री गडाखांकडे मागणीhttps://t.co/cA6YuPN86z#BalasahebMurkute #ShankarraoGadakh @GadakhShankarao
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021
‘शेतकर्यांसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावे. शेतकर्यांनी पेरणी केल्यानंतर पाऊस न पडल्यामुळे त्यांची मोठी हानी होत आहे. आता धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील आठवड्यात मुळा धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यांतून शेतकर्यांसाठी आवर्तन सोडावे’, या मागण्या करण्यासाठी मुरकुटे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्या वेळी ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.