११ जुलैपासून गोकुळच्या दूध खरेदी दरात वाढ ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर
कोल्हापूर – गोकुळच्या (जिल्हा दूध उत्पादक संघच्या) दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. म्हैशीच्या दुधाचा खरेदी दर २ रुपयांनी, तर गायीच्या दुधाचा खरेदी दर १ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. याचा लाभ दूध उत्पादकांना मिळणार आहे. ही वाढ ११ जुलैपासून लागू होईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ९ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अन्य संचालक आणि मान्यवर उपस्थित होते.
अमूलनंतर आता गोकुळनेही दूध दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. पाहा, डिटेल्स…#Gokulmilk #Kolhapur https://t.co/okcIRXWcUk
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2021