घरातील ७४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये चोरून हिंदु मुलीने धर्मांधासमवेत केले पलायन !
नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !
|
नांदेड, ९ जुलै (वार्ता.) – येथील १९ वर्षीय हिंदु मुलीने इशाद मोइनोद्दीन अत्तार या धर्मांधाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून घरातून पळून जाऊन त्याच्याशी निकाह केला आहे. पळून जाण्यापूर्वी त्या मुलीने घरातील ७४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याने मुलीच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील हणेगाव येथील एका मोठ्या कापड व्यावसायिकाची ही मुलगी आहे, तर धर्मांध मुलाचे वडील या व्यावसायिकाची भूमी कसतात.
मुलगी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असून धर्मांध इशाद इयत्ता १० वी नापास आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. प्रारंभी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. (यातून हिंदूंच्या समवेत पोलिसांचे वागणे कसे आहे, हे समजते. याच ठिकाणी एखाद्या मुसलमानाने तक्रार केली असती, तर पोलिसांनी त्वरित तक्रार घेऊन त्याचे अन्वेषण चालू केले असते, कारण तक्रार न घेतल्यास, पुढे होणार्या परिणामांची पोलिसांना जाणीव असते. – संपादक) त्यामुळे अखेर मुलीच्या वडिलांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाच्या आदेशानंतर मरखेल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हिंदु मुलीच्या वडिलांचे नेमके आरोप काय ?
‘हिंदु मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार मोइनोद्दीन अत्तार यांच्या मुलाने त्यांच्या मुलीशी जवळीक आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धर्मांध इशाद याने त्यांच्या मुलीला घरातील परंपरागत ७४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपये रक्कम समवेत घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलीने हा सर्व ऐवज मुलाच्या सांगण्यावरून घरातून चोरून नेला. दोघे पळून गेले आहेत.
मुलाने मुलीचे धर्मांतर केले, व्यावसायिकाच्या कुटुंबियांचा दावा
या प्रकरणात धर्मांधाने मुलीचे भाग्यनगर (हैदराबाद) येथे धर्मांतर केले, असा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे; पण त्याच वेळी नांदेड पोलिसांनी धाड घालून संबंधितांना कह्यात घेतले आहे. या घटनेमुळे हणेगाव येथे तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुलगी म्हणते, ‘स्वतःच्या संमतीने धर्म पालटला !’
या मुलीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असून त्यात तिने सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मी माझ्याच गावाचा तरुण इशाद मोइनोद्दीन अत्तार याच्यावर प्रेम करते. ही गोष्ट माझ्या कुटुंबियांना गेल्या ५ वर्षांपासून माहीत आहे; पण ते जेव्हा आमच्या विवाहाला नकार देत होते, तेव्हा आम्ही दोघांनी मिळून भाग्यनगर येथे येऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला. मी १ मार्च या दिवशी येथे आली. मी त्याच दिवशी स्वेच्छेने ‘इस्लाम’चा स्वीकार केला. त्यानंतर दुसर्या दिवशी आम्ही दोघांनी निकाह केला’, असे तरुणी व्हिडिओत बोलतांना दिसत आहे. (धर्मांधांच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात हिंदु मुली सहज फसून धर्मांतरित होतात, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. हिंदूंना धर्मशिक्षित करणे, तसेच लव्ह जिहादविषयी समाजात जागृती करणे यांसाठी हिंदुत्वनिष्ठांनी कंबर कसणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्यासाठी प्रशासनावर दबावही आणावा लागेल. – संपादक)