पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत !

९ जुलै २०२१ या दिवशी पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे द्वितीय मासिक श्राद्ध झाले त्या निमित्ताने…

पू. डॉ. नंदकिशोर वेद

कु. पौर्णिमा शर्मा (पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची मेहुणी), देहली

१. भाऊजी (पू. डॉ. नंदकिशोर वेद) नेहमीच एका मार्गदर्शकाप्रमाणे होते ! : भाऊजी (पू. डॉ. नंदकिशोर) माझ्यासाठी नेहमीच एका मार्गदर्शकाप्रमाणे होते. त्यांना कोणत्याही विषयावर आणि काहीही विचारले, तरी त्यांच्याजवळ योग्य उत्तर असायचे. ते आमच्या चुकासुद्धा आम्हाला पुष्कळ सहजतेने आणि प्रेमाने सांगायचे. त्यामुळे त्या अंतर्मनापर्यंत जात. प्रत्येक परिस्थितीला आणि प्रसंगाला ते पुष्कळ धैर्याने हाताळत अन् सकारात्मक रहात असत. कोणतीही सेवा ते पुष्कळ चिकाटीने आणि परिपूर्णतेने करायचे.

 कु. रिना मेहरोत्रा (पू. डॉ. नंदकिशोर यांची मानलेली बहीण), सीमाशुल्क अधिकारी, लक्ष्मणपुरी

दादांना (पू. डॉ. नंदकिशोर यांना) पुन्हा नवीन जीवन आणि निरोगी शरीर मिळेल ! ईश्वर त्यांना सद्गती देवो. माझ्या बालपणातील आठवणी आणि अनुभवलेले अनेक क्षण, असे बरेच काही त्यांच्यासमवेत गेले आहे.

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पत्नीच्या बहिणींच्या मुलांचे अभिप्राय

१. कु. दिव्या, नोएडा, उत्तरप्रदेश.

१ अ. काका (पू. डॉ. नंदकिशोर वेद) अतिशय प्रेमळ आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व असलेले होते ! : काका (पू. डॉ. नंदकिशोर) आमच्यासाठी प्रेरणादायी होते. ते अतिशय प्रेमळ होते. त्यांचा स्वभाव आणि वागणे सर्वांसाठी समान अन् आदरयुक्त होते. ते नेहमी सकारात्मक आणि शांत रहात असत. इतरांना त्यांनी खुल्या मनाने स्वीकारले होते. ते सर्वांची पुष्कळ काळजी घ्यायचे. त्यांच्या जाण्यामुळे आमची मोठी हानी झाली आहे; पण त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे आम्ही आनंदी आहोत. लहानपणी त्यांनी काकांच्या रूपात आमच्या आजोबांची कमतरता भरून काढली आहे. ते देवमाणूस होते.

२. सौ. हेमा दहिया, नोएडा, उत्तरप्रदेश.

२ अ. निःस्वार्थी आणि सात्त्विक वृत्ती असलेल्या अन् सर्वांना आदर आणि प्रेम देणार्‍या पू. नंदकिशोरकाकांशी बालपणातल्या पुष्कळ आठवणी जोडलेल्या असणे : पू. नंदकिशोरकाका आता आमच्यामध्ये राहिले नाहीत. पू. काका एक पुष्कळ चांगली व्यक्ती होते, ज्यांनी आम्हाला पुष्कळ प्रेम दिले. त्यांनी सर्वांना आदर आणि प्रेम दिले. त्यांनी कधीही कोणत्या व्यक्तीमध्ये भेदभाव केला नाही. ते निःस्वार्थपणे सर्वांना साहाय्य करायचे. त्यांच्या घरी जे कुणी जायचे, त्या सर्वांना ते प्रेम द्यायचे. घरी गेलेल्या कुणालाही ते न खाता-पिता कधी जाऊ द्यायचे नाहीत. आमच्या बालपणातील पुष्कळ सार्‍या आठवणी त्यांच्याशी जोडलेल्या आहेत, ज्या आमच्या नेहमीच स्मरणात रहातील. ती एक सरळ स्वभावाची आणि सात्त्विक व्यक्ती होती. त्यामुळेच त्यांनी जीवनातील अंतिम कालावधी भगवत्भक्तीमध्ये घालवला. या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे की, ते गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आश्रमात राहिले. भगवंत त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना !

३. श्री. हिमांशु सोलंकी, नोएडा, उत्तरप्रदेश.

३ अ. पू. डॉ. नंदकिशोर वेद हे एक आदर्श व्यक्तीमत्त्व होते ! : पू. डॉ. नंदकिशोर वेद पुष्कळ प्रेमळ होते. त्यांना राग आलेला मी कधी पाहिला नाही. ते नेहमी हसतमुख आणि स्थिर असत. ते माझ्यासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी कुटुंब, नाती, भावना इत्यादींचे व्यवस्थित संतुलन राखले होते. त्यांना कोणतीही अडचण सांगितली, तरी ते क्षणांत त्यावरील उपाययोजना सांगायचे. एवढेच नाही, तर त्यांनी सांगितलेली उपाययोजना अतिशय योग्य असायची. त्यांच्यासारखी प्रेमळ व्यक्ती नातेवाईक म्हणून दिल्याविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता !

४. कु. अदिती भाटिया आणि निधी भाटिया, देहली

४ अ. चुका झाल्या, तरी प्रेमाने आणि धीर देऊन समजावून सांगणारे पू. डॉ. नंदकिशोर वेदकाका ! : आज आम्ही पू. डॉ. नंदकिशोरकाकांची आठवण काढून आमच्या भावना व्यक्त करतो. पू. काका एक सरळ हृदयाचे आणि मोकळ्या स्वभावाचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांची एक चांगली गोष्ट आम्हाला नेहमीच आठवते, ती म्हणजे, नामजप असो, पूजा असो किंवा महाप्रसाद करण्याची वेळ असो, त्यांच्या प्रत्येक कृतीच्या वेळा ठरलेल्या असायच्या. त्यांनी आम्हाला सदैव मार्गदर्शन केले. आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि पुष्कळ प्रेमही दिले. पू. काका कधी कुणावर रागावायचे नाहीत. कित्येकदा आमच्याकडून काही चुका झाल्या, तरी ते प्रेमाने आणि धीर देऊन समजावून सांगायचे. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी नेहमी आमच्या लक्षात रहात. पू. काकांच्या चरणी नमस्कार !’


पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

१. वागण्यात सहजता असणे

‘श्री. नंदकिशोर वेद यांचा आणि माझा प्रथम परिचय वर्ष २००३ मधील अतीथंडीच्या दिवसांत फैजाबाद (अयोध्या) येथे त्यांच्या निवासस्थानी झाला. त्या क्षणापासूनच त्यांची वागणूक इतक्या सहजतेची आणि आदराची होती की, ‘आपण त्यांच्या घरातीलच एक आहोत’, असे वाटावे. मुख्य म्हणजे अशी त्यांची वागणूक शेवटच्या क्षणापर्यंत तशीच राहिली.

२. अहंकार अल्प असणे

त्यांच्या अहंकार विरहिततेचे एक उदाहरण, म्हणजे ‘ते रशियाला शिक्षणासाठी जाऊन तेथे काही काळ राहून आले आहेत’, असे त्यांच्या तोंडून कधीही आले नाही. त्यांच्याशी खूप बोलल्यानंतर त्यांच्याकडून मला हे समजले. मी त्यांना म्हटलेसुद्धा की, तुम्ही हे स्वतःहून कधी सांगितले नाही. बाकीचे कुणी असते, तर त्यांनी कधीच सांगितले असते. त्यावर त्यांचे म्हणणे होते, ‘‘ही आता खूप जुनी गोष्ट झाली. त्यात काय सांगायचे ?’’

३. प्रसाराचे नियोजन चांगल्या प्रकारे करणे

अयोध्या येथे प्रसारासाठी गेल्यानंतर त्यांच्या घरीच मुख्यत्वे रहाणे होत असे. जेवढे दिवस मी तेथे असेन, तेवढे दिवस माझा दिवस चांगल्या प्रकारे वापरला जाईल, यासाठी ते प्रयत्न करायचे. जवळपासच्या गावात एखाद्या ठिकाणी प्रसारासाठी जायचे असेल, तर ते स्वतः समवेत येत असत.

४. प्रेमभाव

तेथील दिवस संपले की, परतीच्या प्रवासाला जायच्या दिवशी ते अयोध्या येथील एका प्रसिद्ध पेढ्याच्या दुकानात घेऊन जात आणि तेथून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या साधकांना देण्यासाठी पेढे खरेदी करून देत असत. त्यांची माझ्याशी बोलण्यातील, तसेच वागण्यातील सहजता मी प्रसारात सेवा करत नसतांनाही तशीच राहिली.

५. आजारपण स्वीकारणे

त्यांच्या आजारपणात त्यांना होत असलेल्या वेदना आणि अडचणी ते सांगत असत; परंतु त्या सांगतांना कधी त्यांच्या तोंडवळ्यावर वैताग किंवा ‘आहे ते दुःख संपून जाऊ दे’, अशी भावनाही दिसली नाही. जेव्हा त्यांची प्रकृती अगदीच बिघडली, त्या वेळीही ‘त्यांचे मन आहे त्या प्रसंगाला किती स्थिरपणे सामोरे जात आहे’, हे जाणवले. त्यांना बोलायला कष्ट होत होते, तरी त्यांच्या तोंडवळ्यावर त्यांची समस्या सांगतांना दुःखाचे काही चिन्ह नव्हते.’

डॉ. नंदकिशोर वेद संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

‘डॉ. वेद यांचे अंतिम दर्शन घेतांना माझ्या मनाला आनंद जाणवत होता. त्यांना पाहून असे वाटले की, हे मृत्यूत्तर संत होतील.’ – आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२१)

(हे लिखाण संत होण्यापूर्वीचे असल्याने पू. डॉ. वेद यांच्या नावात पालट केलेला नाही. – संपादक) 

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक