WhatsApp च्या गोपनीयतेच्या धोरणावर आम्ही सध्या स्वेच्छेने बंदी घातली आहे ! – WhatsApp ची देहली उच्च न्यायालयात माहिती

यातून व्हॉट्सअ‍ॅपचा उद्दामपणा दिसून येतो ! ‘व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेच्या धोरणावर सरकारने आक्षेप घेतला असून तो आम्ही परेच्छेने तात्पुरता मान्य करत आहोत’, असेच या आस्थापनाला यातून सुचवायचे आहे ! सरकार न जुमानणार्‍या आणि भारतीय कायदे अमान्य असणार्‍या अशा विदेशी आस्थापनांना सरकारने त्यांच्या देशात हाकलून दिले पाहिजे !

नवी देहली – व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेच्या धोरणावर (‘प्रायव्हसी पॉलिसी’वर) आम्ही सध्या स्वेच्छेने बंदी घातली आहे, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने देहली उच्च न्यायालयाला दिली. गोपनीयतेच्या धोरणावरून व्हॉट्सअ‍ॅप आस्थापनाविरुद्ध देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपने ही माहिती दिली.

व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकार्‍याने सांगितले की, जोपर्यंत भारतीय संसदेकडून ‘माहिती संरक्षण कायदा’ लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांना आमचे नवे गोपनीयता धोरण मान्य करण्याची सक्ती करणार नाही. यासह आमचे हे धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांवरही आम्ही कुठलेही निर्बंध लादणार नाही, तसेच त्यांच्यावर बंदी आणणार नाही.