केरळमध्ये आढळला ‘झिका’ विषाणूचा देशातील पहिला रुग्ण !
गर्भवती महिला आणि नंतर तिला झालेल्या मुलालाही संसर्ग !
नवी देहली – केरळमध्ये एक २४ वर्षीय गर्भवती महिला आणि नंतर तिला झालेला मुलगा हे ‘झिका’ विषाणूने संसर्गित झाल्याचे आढळले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली. डासांमुळे पसरणार्या ‘झिका’ विषाणूचे रुग्ण देशात प्रथमच आढळले आहेत. थिरूवनंतपूरम्मध्ये ‘झिका’ विषाणूचे आणखी १३ संशयित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’मध्ये पाठवण्यात आले आहेत.
The 24-year-old pregnant woman was down with fever, headache and rashes last month. The first results showed a mild positive sign of Zika virus and later from 19 samples tested, 13 also showed Zika positive. https://t.co/a767WDxNdM
— India TV (@indiatvnews) July 8, 2021
‘झिका’ विषाणूच्या संसर्गाची लक्षणे !
झिका विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये मध्ये ताप, त्वचेवर लाल रंगाचे डाग पडणे, सांधेदुखी, तसेच डोळे लाल होणे, अशी अनेक लक्षणे दिसून येतात. झिका संसर्गित रुग्ण ८ दिवस संसर्गाच्या प्रभावाखाली रहातात. गर्भवती महिलांना झिका विषाणू संसर्गाचा अधिक धोका आहे. यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसह जन्माला येण्याचा धोका अधिक असतो.