श्रीरामजन्मभूमी आंदोलनात प्राणत्याग केलेल्या कारसेवकांच्या घरापर्यंत रस्ता बनवून त्यांना त्यांची नावे देणार !
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची घोषणा !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी आंदोलनामध्ये प्राणत्याग केलेल्या राज्यातील कारसेवकांच्या घरापर्यंत रस्ते बनवण्यात येतील आणि त्यांना या कारसेवकांची नावेही दिले जातीलल, तसेच त्यांची छायाचित्रेही लावण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली.
Roads would be named on Kar sevaks who died during Ram Janmabhoomi movement in U.P, says Deputy CM Keshav Mauryahttps://t.co/zhPECiGH68
— Zee News English (@ZeeNewsEnglish) July 8, 2021
मौर्य पुढे म्हणाले की, सीमेवर हुतात्मा होणारे सैनिक आणि देशांतर्गत हुतात्मा होणारे पोलीस यांच्या घरापर्यंतही रस्ता बनवण्यात येणार असून याला ‘जय हिंद वीर पथ’ असे नाव देण्यात येणार आहे.