उरावडे (पुणे) येथील अग्नीतांडव प्रकरणी आस्थापनाचे मालक आणि सरकारी अधिकारीच दोषी असल्याचा कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीचा अहवाल

उरावडे येथील एस्.व्ही.एस्. अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजीज कंपनीला लागलेली आग

मुळशी (पुणे) – उरावडे येथील एस्.व्ही.एस्. अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजीज कंपनी मधील ७ जून या दिवशी लागलेल्या आगीसाठी आस्थापनाचे मालक आणि सुरक्षेच्या पडताळणीचे दायित्व असलेले अधिकारीच दोषी असल्याचा अहवाल कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना ५ जुलै या दिवशी सादर केला आहे. त्यातील सूत्रे राष्ट्रीय पातळीवरील हरित लवादाने जी समिती नेमली आहे, त्यांच्यासमोर तसेच महाराष्ट्र सरकारसमोर सादर करावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

या आगीत १७ कामगार होरपळून मृत्यूमुखी पडले होते. घटना जुनी झाल्यावर दोषींवर कारवाई करण्याचे बाजूला पडेल या शंकेने विविध कामगार संघटनांनी स्वतःच एक संयुक्त कृती समिती स्थापन केली. घटनास्थळाची पाहणी करून, काही प्रत्यक्षदर्शींसमवेत बोलून या समितीने अहवाल सिद्ध केला. त्याचे निष्कर्ष समजू शकले नाहीत.