दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १ मार्च २०२० या दिवशी प्रसिद्ध झालेले ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे आणि तिच्या आगमनाचे सूक्ष्म परीक्षणाचे लेख वाचत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे
१. ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे मिरवणूक आणि जयघोष यांच्यासह सनातनच्या रामनाथी आश्रमात आगमन झाल्याचे दृश्य मला पुन:पुन्हा डोळ्यांसमोर दिसून चैतन्य आणि आनंदाची अनुभूती आली.
२. ते लेख वाचत असतांना मला चैतन्य मिळत असल्याचे जाणवले.
३. लेख वाचून झाल्यावर शरीर आणि मन हलके झाल्याचे जाणवले.
४. पू. गाडगीळकाका (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) यांनी लिहिलेल्या लेखात मूर्तीची वैशिष्ट्ये वाचतांना जी वैशिष्ट्ये पहाण्याची माझ्याकडून राहिली होती. ती मूर्ती पहातांना स्मरण होऊन मी ती वैशिष्ट्ये पाहिली. त्या लेखावरून ‘आपण कोणत्याही देवतेच्या मूर्तीकडे किती बारकाईने पहायला पाहिजे’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.
५. कु. मधुरा भोसले यांच्या लेखातून देवतांच्या पूजाविधीमध्ये ‘हळद, कुंकू, शेंदूर, फुले, अक्षता वहाणे, उदबत्ती आणि दिवा ओवाळणे अन् नैवेद्य दाखवणे’, या धार्मिक कृतींचा भाविकाच्या कोणत्या चक्रावर परिणाम होतात आणि कोणत्या कृतींमुळे कोणत्या तत्त्वाचा लाभ होतो, ते समजले. त्यामुळे मी प्रतिदिन खोलीत पूजा करतांना ती अधिक भावपूर्ण होत असल्याचे लक्षात आले.
६. श्री. निषाद देशमुख यांच्या लेखातून ‘देवतांच्या मूर्तीचे मिरवणुकीने आगमन होत असतांना सूक्ष्मातून सर्व देवता उपस्थित असतात. त्यामुळे देवतेच्या मिरवणुकीतील वातावरणात अधिक भाव, चैतन्य आणि आनंद जाणवतो’, हे सूत्र लक्षात आले.
७. साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला देवतांची मिरवणूक ‘याची देही याचि डोळा’ पहाण्याचे भाग्य लाभले आणि या लेखांतून त्यांतील सूक्ष्मातील भाग शिकायला आणि अनुभवायला मिळाला अन् सूक्ष्म परीक्षण करणारे संत आणि साधक यांच्याविषयी आदर दुणावला. याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीगुरुचरणी शरणागत,
आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(६.३.२०२०)
|