अनुभवण्या गुरुलीला, जन्म घ्यावा गुरूंसह पुनःपुन्हा ।
नको मज मोक्ष,
नको मज मुक्ती ।
अनुभवण्या गुरुलीला,
जन्म घ्यावा गुरूंसह
पुनःपुन्हा ।। १ ।।
गुरुलीलेपुढे मज वाटे ।
मोक्ष आणि मुक्ती थिटे ।
गुरुलीलेपुढे मोक्ष अन् मुक्तीची महतीही पडते फिकी ।। २ ।।
गुरुलीलेची महती शब्दातीत ।
तेथे शब्दांच्याही मर्यादा लक्षात येतात ।
गुरुलीलेपुढे मग शब्दही निःशब्द होऊनी ।
शरणागतीने लीन होतात ।। ३ ।।
गुरुलीलेपुढे मोक्ष आणि मुक्तीही थिटे पडतात ।
म्हणूनच मज वाटे, नको मोक्ष अन् मुक्ती ।
गुरुलीला अनुभवण्यासाठी ।
पुनःपुन्हा गुरूंसह जन्म घेणे ।
यातच माझी मोक्ष अन् मुक्ती ।। ४ ।।
संकलक : श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर. (१७.१०.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |