देवपूजा माझी देवपूजा ।
साधकांना जन्म-मरणाच्या फेर्यांतून सोडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
देवपूजा माझी देवपूजा ।
चरण तुझे गुरुराया । माझी देवपूजा ।। धृ.।।
गुरुचरणांचे स्मरण । तेची माझे नामस्मरण ।। १ ।।
गुरुचरणांचा संग । तेची देती सत्संग ।। २ ।।
गुरुचरणांचा ठेवा । तीच माझी धर्मसेवा ।। ३ ।।
गुरुचरणांचा भोग । तोची माझा त्याग ।। ४ ।।
गुरुचरणांची माती । माझी त्यांवर प्रीती ।। ५ ।।
गुरुचरणांचे ध्यान । तोची माझा भक्तीभाव ।। ६ ।।
गुरुचरणांचे चैतन्य । तेच माझे साधन ।। ७ ।।
गुरुचरणांचे पायी । जीवन माझे सार्थक होई ।। ८ ।।
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.२.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |