आतापर्यंत २०८ जणांचा जामीन संमत, तर १८ आरोपींचा जामीन फेटाळला

पालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी २२८ जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी आणखी १४ जणांचा जामीन अर्ज संमत करण्यात आला आहे, तर इतर १८ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर्.एस्. गुप्ता यांच्या दालनात या प्रकरणी सुनावणी पार पडली. आतापर्यंत जामीनावर सुटका झालेल्यांची संख्या २०८ इतकी झाली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या १२ आरोपींचे वय १८ वर्षांपेक्षा अल्प असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली होती. या प्रकरणात ७५ जणांना मुख्य आरोपी करण्यात आले असून हत्येप्रकरणी ८०८ संशयितांची चौकशी करण्यात आली होती.