इस्लामी देशांच्या संघटनेकडून काश्मीरमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याचा भारताला प्रस्ताव !
भारतातील मुसलमानांसमवेत होणारा कथित भेदभाव याविषयी भारतीय राजदूतांशी चर्चा !
|
रियाध (सौदी अरेबिया) – ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेचे सरचिटणीस युसूफ अल्-ओथइमीन यांनी सौदी अरेबियातील जेद्दा येथे भारतीय राजदूतांची भेट घेतली. या भेटीत भारतातील मुसलमानांसमवेत होणारा भेदभाव आणि काश्मीर यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये ओ.आय.सी.चे एक शिष्टमंडळ पाठवण्याचाही प्रस्ताव ओथइमीन यांनी भारताला दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा चर्चा चालू व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय दूतावास अथवा परराष्ट्र मंत्रालय यांनी याविषयी कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध केलेले नाही. यापूर्वी भारताने कलम ३७० रहित केल्यावर ओ.आय.सी.ने टीका केली होती.
The OIC has been echoing Pakistan to oppose India’s August 2019 move to strip #JammuAndKashmir of its special status and to reorganise the erstwhile state into two Union Territories.
— Deccan Herald (@DeccanHerald) July 8, 2021