पुणे येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन !
पुणे – सरकारने विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ जुलै या दिवशी आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. आरक्षण मिळावे यासाठी भाजपचा संघर्ष कायम रहाणार असल्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.