गोव्यात दिवसभरात १९२ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात ७ जुलै या दिवशी १९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाविषयक ५ सहस्र २२ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ३.८ टक्के आहे. दिवसभरात १९६ रुग्ण बरे झाले, तर २० रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १ सहस्र ९५० झाली आहे.