ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांसह (डोससह) लसीकरण पूर्ण होणार ! – मुख्यमंत्री
पणजी – गोव्यात ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रांसह (डोससह) लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. राज्यातील ७६ टक्के लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून उर्वरितांना ३१ जुलैपर्यंत पहिली मात्रा देण्यात येणार आहे.
गोव्यात ‘टिका उत्सव’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोव्यात आतापर्यंत १० लक्ष ६८ सहस्र लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. ‘टिका उत्सव’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिल्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांचे आभार मानले आहेत, तसेच लसीकरण मोहीम यशस्वी करण्यास अथक परिश्रम घेणारे डॉक्टर, परिचारक (पुरुष नर्स) आणि परिचारिका (महिला नर्स) आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.