धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !
सोलापूर – भारत एक स्वयंभू ‘हिंदु राष्ट्र’ आहे. विश्वातील प्रत्येक प्राणीमात्राच्या सुख-समृद्धीचा विचार करण्याची शिकवण महान हिंदु धर्माने दिली आहे. हिंदु धर्म नेहमी इतरांच्या हिताचाच विचार करत आलेला आहे; मात्र याच हिंदु धर्माला नष्ट करण्याच्या हेतूने धर्मांध घुसखोर, जिहादी भारतात आले आणि हिंदु संस्कृती, मंदिर आणि शिक्षण केंद्र यांवर आघात केले, तसेच छळ, बळ आणि कपटाने हिंदूंचे धर्मातर केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मोठ्या संख्येने हिंदूंचे छळ, बळ आणि कपटाने मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यात येत आहे. १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी देहली येथे महंमद उमर गौतम आणि काझी जहांगीर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. या भारतविरोधी षड्यंत्राविषयी कुठेही चर्चा झाली नाही, त्यामुळे हिंदूंना वेळीच जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ या विषयावर नुकतेच ‘ऑनलाईन’ चर्चासत्र घेण्यात आले. या कार्यक्रमात सर्वाेच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, उत्तरप्रदेश येथील ‘इंडिक अकॅडमी’चे समन्वयक विकास सारस्वत, हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन जनार्दन यांनी मार्गदर्शन केले. या वेळी चर्चासत्रामध्ये ‘धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण देण्यासह धर्मातरबंदी कायदा करणे आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन सर्वच वक्त्यांनी केले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे आणि कु. वर्षा जेवळे यांनी केले.
धर्मांतराला उत्तर प्रतिधर्मांतरानेच द्यायला हवे ! – विकास सारस्वत, ‘इंडिक अकॅडमी’चे समन्वयक, उत्तरप्रदेश
१. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. धर्मांतरबंदी कायदा अनेक राज्यांत असूनही एकाही मिशनरींवर कठोर कारवाई केलेली नाही. अन्य अवैध कृत्यांमध्ये सापडल्यावरही धर्मांधांवर कारवाई करण्याचे धाडस सरकार आणि पोलीस दाखवत नाहीत. धर्मांतर कसे करावे, यासाठी विदेशांत विविध पद्धतीचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. अशांचा सामना करण्यासाठी केवळ धर्मांतरबंदी कायद्यावर विसंबून राहून चालणार नाही. कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. त्यामुळे हिंदु धर्माचे मिशनरी (धर्मप्रचारक) निर्माण करायला हवेत. धर्मांतराला उत्तर प्रतिधर्मांतरानेच द्यायला हवे.
२. आतापर्यंत ‘केवळ माझाच धर्म खरा बाकी अन्य धर्मीय खोटे आहेत’, या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले. हे विचार विघातक असून हिंदूंचे धर्मांतर करणार्यांचे षड्यंत्र वेळीच ओळखणे आवश्यक आहे. यामध्ये गरीब, गरजू, मूक-बधिर लोकांना लक्ष्य करण्यात येत असून एक प्रकारे मानवतेच्या विरोधातील हे कृत्य आहे.
३. तबलिगी जमातीच्या लोकांनी कोरोना संसर्गाच्या काळात जी कृत्ये केली, त्यावर त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक होते; मात्र सरकारने त्यांना पाठीशी घालून कारवाई करण्याचे टाळले.
एकदा जागृत झालेला हिंदु धर्मांतरित होत नाही, त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण द्या ! – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
१. देशातील ८ राज्यांमध्ये आज हिंदु अल्पसंख्यांक झालेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात १ लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याचे ख्रिश्चन मिशनरी उघडपणे सांगत आहेत. एका धर्मांतर झालेल्या व्यक्तीकडून आंध्रप्रदेशात १०० हून अधिक मूर्ती भंजनाच्या घडना घडलेल्या आहेत. एका ठिकाणी ख्रिश्चन पाद्री विजय म्हणाला की, हिंदूंना आमची अडचण होत असेल, तर आम्हाला वेगळे राष्ट्र द्या. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते. त्यामुळे धर्मांतरावर मूलभूत उपाय म्हणजे हिंदूंना धर्माचे शिक्षण देणे. यासाठी समितीने अनेक ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू केले आहेत. त्यातून हिंदूंना जागृत आणि संघटित केले जात आहे. जागृत झालेला हिंदु धर्मांतरित होत नाही.
२. आंध्रप्रदेश येथील मंदिरांमध्ये नमाज पढतांनाचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. अशा प्रकारे हिंदूंच्या देवालयांवर नियंत्रण आणण्याचा एक प्रकारे प्रयत्न चालू आहे.
३. पाद्री प्रवीण याने जाहीररित्या सांगितले होते की, मी स्वतः ६ लाख लोकांना धर्मांतरित केले आहे. सगळे देव खोटे आहेत. त्यामुळे मी त्यांना लाथ मारली, तसेच ७०० गावांना दत्तक घेतले आहे. अशा प्रकारे विविध जिहादांच्या माध्यमातून भारतविरोधी कार्य केले जात आहे.
४. बांगलादेशी घुसखोरांना मौलवीचे शिक्षण देण्यात येते. भारताची राजधानी जिथे असुरक्षित आहे, तिथे भारताच्या अन्य भागांत सुरक्षितता असेल का ? यावर कठोर उपाययोजना करण्यासह तसा कायदा करून त्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे.
धर्मांतरबंदी करण्यासाठी केंद्रीय कायदा करण्यासह हवाला आणि काळा पैसा यांवर प्रतिबंध आवश्यक ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, वरिष्ठ अधिवक्ता, सर्वाेच्च न्यायालय
१. सनातन धर्माच्या विरोधातील कार्य, तसेच भारताच्या विरोधातील कोणतेही कार्य विनामूल्य होत नाही. यामध्ये ‘रोख रक्कम, हवाला आणि काळे धन’ या ३ प्रकारच्या माध्यमातून हे धर्मांतर होते. भारतात १० प्रकारचे ‘जिहाद’ चालू आहेत. त्यातीलच ‘धर्मांतर जिहाद’ हेही एक जिहाद आहे. भारतात धर्मांतरासाठी विदेशातून ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. केवळ मिशनरी-धर्मांधांनाच नव्हे; तर नक्षलवादी, माओवादी, फुटिरतावादी, आतंकवादी या सर्वांना हवालाच्या माध्यमातून पैसा सर्वत्र पोचवला जातो. त्यामुळे देशाला सर्वांत मोठा धोका ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांमुळे निर्माण झाला आहे. धर्मांतरावर खर्या अर्थाने बंदी आणायची असेल, तर ‘हवाला’ आणि ‘काळे धन’ यांवर प्रतिबंध आणण्यासह धर्मांतराच्या विरोधात कठोरतम कलम भारतीय दंड संहितेमध्ये वाढवावे. त्यात १० ते २० वर्षे कारावास अन् संपत्ती जप्तीचा अंतर्भाव असावा. हिंदु धर्मातील जगद्गुरूंनीही काळानुसार ‘धर्मांतरविरोधी कायद्या’ची मागणी करणे आवश्यक आहे.
२. सध्या देशात बांगलादेश, म्यानमार येथून घुसखोरी केली जात आहे. त्यातून ‘ग्रेटर बांगलादेश’ बनवण्यात येत आहे. ज्याप्रमाणे काश्मीरमधील धर्मांधांनी ‘आम्ही पाकिस्तानसमवेत जाऊ इच्छितो’, अशी मागणी केली. त्याप्रमाणेच येत्या ५ वर्षांतच आसाम आणि बांगलादेश येथूनही अशी मागणी होऊ शकते. पूर्वीच्या काळी गझनीने २२ वेळा भारतावर आक्रमण केले. तो केवळ भारतातील संपत्ती लुटण्यासाठी आला नव्हता, तर त्याचा भारतात इस्लामिक सत्ता स्थापन करण्याचा हेतू होता. आतापर्यंत जे आक्रमणकर्ते आले, ते केवळ संपत्ती किंवा सत्ता लुटण्यासाठी आले नाहीत, तर स्वत:ची धार्मिक सत्ता स्थापित करण्यासाठी आले होते.
३. सनातन धर्म वाचल्यास देश वाचणार आहे आणि देश वाचल्यास येथील सत्ता वाचू शकेल. ज्या राज्यांत हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत, तेथे भाजप आणि काँग्रेस दोघांचीही सत्ता नाही. या देशात सनातन धर्म वाचवण्यासाठी घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतरबंदी कायदा, तसेच लोकसंख्या नियंत्रण कायदा हे ३ कायदे त्वरित करणे आवश्यक आहे, तसेच या कायद्यांची कठोर कार्यवाही व्हायला हवी.
४. जोपर्यंत इंग्रजांनी सिद्ध केलेले कायदे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत हिंदु धर्मावरील आक्रमणे थांबणार नाहीत. भारताला गुलाम बनवण्यासाठी हे कायदे करण्यात आले होते. हे कायदे चांगले असते, तर १०० इंग्रजांना तरी शिक्षा व्हायला हवी होती. समस्या सोडवतांना ती मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यामुळे कायद्यांमध्ये पालट करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाहून अधिक गंभीर स्थिती धर्मांतराच्या संदर्भात निर्माण झाली आहे. भारत सरकार फ्रान्सकडून कोट्यवधी रुपये व्यय करून ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी करू शकते, तर फ्रान्समधील ‘धर्मांतरविरोधी कायदा’ स्वीकारत का नाही ?
५. अमेरिकेत ‘हवाला’नुसार पैसे दिल्यास कठोर शिक्षा करण्यात येते. भारतात अनेक विधीज्ञ आहेत, त्यांच्या साहाय्याने चांगले कायदे बनवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे कोरोना संसर्गावर लस बनवतांना विविध शक्यता लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या लसी बनवण्यात आल्या. त्याप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदा बनवण्यासाठी सरकार विविध प्रकारचे कायदे करून ते कठोरपणे कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न का करत नाही ?
६. रोहिंग्या बांगलादेशींना भारताबाहेर काढण्यासाठी, तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया (एन्.आर्.सी.) लागू करण्यासाठी मी स्वत: वर्ष २०१७ मध्ये याचिका प्रविष्ट केली होती. केंद्र सरकारसमवेत सर्व राज्यांपर्यंत याविषयी नोटीस गेली; मात्र आजपर्यंत केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून उत्तर आलेले नाही.
धर्मांतरबंदी कायद्याच्या मागणीसाठी सर्व हिंदूंनी ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे एकत्र यावे ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, वरिष्ठ अधिवक्ता, सर्वाेच्च न्यायालय‘धर्मांतरणबंदी कायदा’ होण्यासाठी सर्व हिंदूंनी ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे एकत्र यावे. हा कायदा होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न केल्यास ‘धर्मांतरबंदी’ कायदा होण्यास वेळ लागणार नाही, असे आवाहन अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी केले. |
हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू ट्यूब आणि ट्विटर या माध्यमातून ४ सहस्र २०० हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला. |