शिकण्याची वृत्ती असलेली आणि पुढाकार घेऊन सेवा करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची म्हापसा, गोवा येथील कु. वेदा विराज प्रभू म्हाम्बरे (वय १३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वेदा विराज प्रभू म्हाम्बरे एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (८.७.२०२१) या दिवशी म्हापसा, गोवा येथील कु. वेदा विराज प्रभु म्हाम्बरे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(‘वर्ष २०१८ मध्ये कु. वेदाची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)
कु. वेदा विराज प्रभु म्हाम्बरे हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !
‘वेदाच्या वेळी गर्भारपणी मी नामजप आणि सेवा करत होते. त्यामुळे वेदावर नाम आणि सेवा यांचे संस्कार झाले. गेल्या वर्षभरात गुरुमाऊलींच्या कृपेने ‘वेदातील अनेक सुप्त गुण विकसित होत आहेत’, असे मला जाणवले. त्याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
१. शिकण्याची वृत्ती
म्हापसा येथे बालसंस्कारवर्ग, प्रथमोपचारवर्ग आणि इतर सत्संग घेतांना ‘ब्रॉडकास्टिंग’ची (प्रसारणाची) सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता होती. याविषयी मी वेदाला सांगितले. तिला ‘ही सेवा कशी करायची ?’, हे ठाऊक नव्हते. तिने सौ. वेदिका पालन यांच्याकडून ही सेवा शिकून घेतली. आता वेदा ही सेवा नियमितपणे करते. यातून मला तिच्यातील शिकण्याची वृत्ती लक्षात आली.
२. निर्भयता
हनुमान जयंतीला मुलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात निर्भयपणे गोष्ट सांगणे : या वर्षी हनुमान जयंतीला गोव्यातील बालसाधक आणि अन्य मुले यांच्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वेदाला ‘ज्यात राम नाही, ती मोत्याची माळही कवडीमोलाची’, ही हनुमानाची गोष्ट सांगायची होती. वेदाने ती गोष्ट वाचून तिचा अभ्यास केला आणि अगदी निर्भयपणे ती गोष्ट सांगितली.
३. घरकामांत साहाय्य करणे
लहानपणापासूनच वेदा घरकामांत मला पुष्कळ साहाय्य करते. ती धान्य निवडणे, भांडी घासणे, तसेच शीतकपाट स्वच्छ करणे, यांसारखी कामे करते. त्यामुळे मला तिचा पुष्कळ आधार वाटतो.
४. पुढाकार घेऊन सेवा करणे
अ. कोरोनापूर्व काळात ती माझ्या समवेत वाचकांच्या घरी येऊन साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत असे.
आ. सनातन संस्थेच्या वतीने जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतले जातात. काही वेळा जिज्ञासूंना सत्संगाला जोडण्यात अडचण येत होती. हे लक्षात आल्यावर वेदाने जिज्ञासूंना ‘सत्संगाला कसे जोडायचे ?’, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि प्रत्यक्ष जोडूनही घेतले.
इ. या वर्षी माझ्याकडे गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेच्या विज्ञापनांच्या संदर्भातील एक सेवा होती. मी इतर सेवांत व्यस्त असल्याने वेदाने दायित्व घेऊन ही सेवा पूर्ण केली.
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे प्रत्यक्ष समाजात जाऊन सेवा करणे शक्य नव्हते; परंतु गुरुमाऊलीच्या कृपेने संगणकीय सेवा, ‘सोशल मिडिया’ची सेवा आणि ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा मिळाली. वेदाच्या साहाय्यामुळे मला या सर्व सेवा करता आल्या.
‘हे गुरुमाऊली, वेदातील गुण वृद्धींगत होवोत आणि तिच्यातील स्वभावदोष दूर होऊन तिची उत्तरोत्तर जलद प्रगती होवो’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. विशाखा विराज प्रभु म्हाम्बरे (कु. वेदाची आई), म्हापसा, गोवा. (२०.६.२०२१)
|