वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी गुरुपूजन सांगतांना आलेल्या अनुभूती
१. ‘गुरुपूजनाची सिद्धता करतांना मला मनातून आनंद जाणवत होता.
२. गुरुपूजनाच्या आरंभी :
‘कुरुक्षेत्रावर गीता सांगण्यापूर्वी जसे वातावरण स्तब्ध झाले होते आिण कालचक्रच थांबले होते, तसेच गुरुपूजनाच्या आरंभी वातावरण स्तब्ध झाले आहे’, असे मला जाणवले.
३. गुरुपूजन चालू असतांना :
गुरुपूजन चालू झाल्यावर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मोठ्या मोठ्या होत गेल्या’, असे मला जाणवले. संपूर्ण व्यासपीठ निर्गुणात जात असल्याचे जाणवून तेथे मला केवळ भगवान नारायणस्वरूपात परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.’ – श्री. ईशान जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |