भाग्य माझे उजळले, परम पूज्य मला भेटले ।
साधकांना जन्म-मरणाच्या फेर्यांतून सोडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
भाग्य माझे उजळले ।
परम पूज्य (टीप १)
मला भेटले ।। धृ. ।।
करूनी घेती नामस्मरण ।
विकार जाती जळून ।
मन होतसे पावन ।
गुरुचरण हृदयी ठेविले ।। १ ।।
गुरुदेव करुणेचा ठेवा ।
केली कशीतरी सेवा ।
गोड करून घ्या गुरुदेवा ।
श्री गुरूंनी चरणी ठेविले ।। २ ।।
परम पूज्य विष्णूचे अवतार (टीप २) ।
गुरुदेव प्रीतीचा सागर ।
माझ्यावरी कृपा फार ।
जन्म-मरणाच्या फेर्यांतून सोडवले ।। ३ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
टीप २ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.११.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |