बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांचे लसीकरण होते; मात्र विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ? – जय आहुजा, ‘निमित्तेकम्’, राजस्थान
जोधपूरमध्ये (राजस्थान) काँग्रेसचे २ अल्पसंख्यांक आमदार आहेत. त्यांनी संघटित होऊन त्यांच्या मतदारसंघात विशेष कोविड केंद्राची उभारणी केली. तेथे येणार्यांना कोरोनावरील लस घेणे बंधनकारक केले; पण पाकिस्तानातील विस्थापित हिंदु शरणार्थींकडे ओळखपत्र आहे, पारपत्र (व्हिसा) आहे. ते घुसखोरी न करता वैध मार्गाने भारतात आले आहेत. असे असतांना राजस्थानमध्ये कितीतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमान यांचे लसीकरण करण्यात आले. मग पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ?