गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?
‘वर्ष १९८० पासून सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी स्वतःच्या हीन, स्वातंत्र्यमूल्यद्रोही कृत्यांनी गोव्याच्या सांस्कृतिक मूल्यांशी आणि देवभूमी असलेल्या या सोज्वळ, आध्यात्मिक प्रतिमेशी अन् पोर्तुगीजपूर्व काळापासून अबाधितपणे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीशी अक्षम्य किळसवाणा द्रोह केलेला आहे ! ज्या असंख्य सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी ऐन तारुण्य, संसारसुख, कुटुंब, स्वतःचे भवितव्य आदी सगळेच पणाला लावून, शत्रू पोर्तुगिजांच्या गुलामीतून गोवा मुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणांचे बलीदान दिले, त्या सर्वांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यमूल्य आकांक्षांचा पार चुराडा अन् घोर अपमान आतापर्यंतच्या सत्तांनी केलेला आहे ! हे परमेश्वरा, हे भारतमाते, हे क्रांतीदेवते, यांना कदापि क्षमा नको ! ते क्षमेस पात्र नाहीत. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारतीय सेनेने गोवा मुक्त केला. आपण सर्व स्वतःलाच आधी एक प्रश्न विचारू आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधू.
वर्ष १९८० पासून आतापर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांनी खरेच गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले का ? कि गोवा मुक्तीमागच्या स्वातंत्र्यमूल्यांचा सत्तेच्या लालसेपायी पार चुराडा करून टाकला ? गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ?
१. भारतीय वारसा (हेरिटेज) जपण्याऐवजी पोर्तुगीज वारसा मात्र प्राणपणाने जपला.
२. पोर्तुगिजांचा विकृत बीभत्स कार्निव्हल, भारंभार सरकारी अनुदान देऊन मुक्त गोव्याचा अधिकृत राज्य-उत्सव बनवला ! तो गोव्याच्या सर्व तालुक्यांत नेऊन पोर्तुगिजांच्या स्मृती जागृत ठेवल्या.
– प्रा. सुभाष वेलिंगकर, भारतमाता की जय संघटना, गोवा.