कराड येथे मोर्चा काढल्याच्या प्रकरणी पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि ८० धारकरी यांच्यावर गुन्हा नोंद !
कराड, ६ जुलै (वार्ता.) – संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि पायी वारी यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै या दिवशी कराड शहरात मोर्चा काढण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे आणि आदेशांचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करत शहर पोलिसांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासह ८० धारकर्यांवर गुन्हा नोंद केला आहे.
‘५ जुलै या दिवशी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघ करून कराड शहरात फेरी काढली आणि मंदिर प्रवेश बंदी असतांना मंदिर उघडून मंदिरात प्रवेश केला’, अशी तक्रार पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.