देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट

वर्ष १८७६ पासून अखंड भारताची फाळणी होऊन अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली. या सर्व फाळण्यांचे मूळ कारण ‘देशातील धर्मांधांची वाढती लोकसंख्या’, हेच आहे. धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जाते. वेगळ्या राज्याची मागणी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे.