इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन !
कार्यकर्त्यांकडून कोरोनाचे नियम पायदळी !
पुणे – येथील बालगंधर्व चौकात झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल तसेच डिझेलची दरवाढ आणि वाढती महागाई या कारणांमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही. आपल्या पोटाला जी झळ पोचते त्यासाठी कोरोनाला बाजूला ठेवून मोदी सरकारनेच आम्हाला रस्त्यावरती आणले आहे. अन्यथा कोरोनाच्या काळात भगिनींना समवेत घेऊन आम्हाला रस्त्यावर येण्याची आवश्यकताच नव्हती; पण घरगुती गॅस सिलेंडरची २५ रुपयांनी झालेली वाढ, गोड्या तेलाचे तिपटीने वाढलेले भाव अशा कारणांनी एकत्र आल्याचे आंदोलकांनी सांगितले. भाजपने अजित पवार यांच्याविरुद्ध जी कारवाई चालू केली आहे त्याला राष्ट्रवादीकडून एक प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.