वणी (यवतमाळ) येथे दळणवळण बंदीमुळे विनामूल्य धान्य मिळत असल्याने मजूर शेतकामासाठी येईनात !

शासनाने साहाय्य म्हणून मजुरांना चालू केलेली मदत मजुरांना आळशी आणि कामचुकार बनवत असेल तर काय उपयोग ? दळणवळण बंदी शिथिल झाल्याने आता शासनाने मजुरांना कितपत साहाय्य करायचे ते ठरवावे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

वणी (यवतमाळ), ६ जुलै (वार्ता.) – येथील काही भागांत शेतमजुरांची चणचण जाणवत आहे. कोरोनाच्या काळात दळणवळणबंदीमुळे बर्‍याच मजुरांना धान्य विनामूल्य मिळत आहे. त्यामुळे त्यांची काम करण्याची इच्छा राहिली नाही. मजूर मिळत नसल्याने घरच्या सर्वांनी मिळून शेतकाम करण्याला पर्याय उरला नाही. पूर्वी सकाळी १० ते सायंकाळ ५ पर्यंत मजुरी २०० रुपये मिळायची. आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ३ ते सायं. ६ अशा २ वेळेत मजुरीचे दर वेगवेगळे आहेत.