सांगली शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर ‘जोडेमारा’ आंदोलन
भाजपच्या १२ आमदारांना निलंबन केल्याचे प्रकरण !
सांगली, ६ जुलै (वार्ता.) – आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करीत असतांना स्वतःचे अपयश लपवण्यासाठी अवैधपणे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने ६ जुलै या दिवशी ‘जोडेमारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या वेळी युवामोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, नगरसेविका भारती दिगडे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेवक संजय कुलकर्णी, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची निर्दशने
कोल्हापूर – १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने ६ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आणि निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, भगवान काटे, दिलीप मेत्राणी, विठ्ठल पाटील, गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, हंबीरराव पाटील, महेश मोरे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सातार्यात भाजपचे बोंबाबोंब आंदोलन
सातारा – सातारा शहरात भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या सुवर्णा पाटील, दीपिका झाड, रिना भणगे, विकास गोसावी, राहुल शिवनामे आदी उपस्थित होते.
नातेपुते (सोलापूर) येथे रस्ता बंद आंदोलन
नातेपुते (सोलापूर) – नातेपुते (सोलापूर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते गावचे माजी सरपंच, भाजपचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांसह अन्य उपस्थित होते.