अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ !
मुंबई – विधान परिषद विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित विचारार्थ प्रलंबित असलेल्या प्रस्तावातील विधान परिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे, तसेच सदस्य भाई जगताप यांनी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध ८ सप्टेंबर २०२० या दिवशी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग आणि अवमानाच्या प्रकरणी, तसेच भाई जगताप यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरुद्ध उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग आणि अवमानाच्या प्रकरणी विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.