कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांची काळजी घेण्याविषयी आयुर्वेदाचे काही उपाय
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांच्या दृष्टीने अधिक घातक असण्याची शक्यता आहे. या काळात लहान मुलांची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो, यासंदर्भात कोटा (राजस्थान) येथील वैद्य मनोज शर्मा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली माहिती येथे देत आहोत.
१. नियमित सकाळ-सायंकाळ देशी गायीचे तूप किंवा बदाम तेल कोमट करून २ – ३ थेंब नाकात घालणे. मुलांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना अणू तेल किंवा मोहरी तेल यांचा वापर करणे टाळावे.
२. दोन चमचे कोमट केलेल्या गायीच्या तूपात २ चिमूट सैंधव मीठ घालून त्याने छाती आणि पाठ यांठिकाणी हलकेसे मालिश करावे. यामुळे फुफ्फसांची क्षमता वाढून कफ असल्यास तो न्यून होण्यास साहाय्य होते. हा उपाय रात्री झोपतांना करावा.
३. लहान मुलांना गरम दुधात हळद, आलं किंवा सुंठ घालून शक्यतो दिवसा पिण्यास द्यावे. या घटकांमुळे दुधाचे पचन व्यवस्थित होऊन नवीन कफ सिद्ध होण्याची प्रक्रिया टळेल.
४. मुलांना अंघोळीपूर्वी ३० मिनिटे अगोदर मोहरी किंवा तीळ तेलाने मालिश करावे.
वरील उपाय लहान मुलांसह अन्यही करू शकतात.
टीप : जेथे तूप किंवा मोहरी तेल सांगितले आहे, तेथे ते न मिळाल्यास खोबरेल तेल वापरू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता अधिक असते आणि खोबरेल तेल शीतल असल्याने ते वापरावे. तसेच खोबरेल तेलाने जंतू मरतात, हे सिद्ध झाले आहे.
– वैद्य मनोज शर्मा, कोटा, राजस्थान.