शिवाजीराव भोसले बँकेचे पुणे येथील ३ शाखा व्यवस्थापक कह्यात !
पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या औंध, कोथरूड आणि वडगावशेरी या ३ शाखांच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांना शिक्रापूर पोलिसांनी कह्यात घेतले. प्रदीप निम्हण, नितीन बाठे आणि गोरख दोरगे अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. वर्ष २००७ मध्ये कर्ज मंजुरी देतांना अनियमितता झाली असून या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली. वरील ३ शाखा व्यवस्थापकांना शिरूर येथील विशेष दंडाधिकार्यांपुढे हजर करणार असून या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने चालू आहे. पुढील कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि सर्व वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचेही शेडगे यांनी सांगितले.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कर्ज प्रकरण, तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक https://t.co/bvpT4ICYyo #Pune | #ShivajiraoBhosaleSahakariBank | #Bank | #CrimeNews | #Loan
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2021