पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात पैशासाठी रुग्णाचा मृतदेह अडवला, सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने देयक माफ केले !
पिंपरी चिंचवड (पुणे), ५ जुलै – येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आशिष कांबळे या रुग्णाच्या देयकासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते; पण त्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि उर्वरित पैसे भरल्याशिवाय मृतदेह देण्यास रुग्णालयाने नकार दिल्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी सामाजिक कार्यकर्त्यांचे साहाय्य घेतले. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केल्याने रुग्णालयाने २ लाख ५० सहस्र रुपयांचे देयक माफ केले आणि त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.